Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात 135 वी कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाच्या खंडानंतर शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील बहुजनांपर्यंत पोहचवणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयात व महाविद्यालयात उत्साहात साजरी होत आहे.
22 सप्टेंबर रोजी पिंपरी गावातून ढोल लेझीम ताशाच्या गजरात आण्णांच्या चित्ररथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती मुल्ला टी.ए.व सौ. नाळे एस. वाय. यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम व झांज पथक तयार केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक गाढवे डी.के., उपमुख्याध्यापक शेख पी.एम.,पर्यवेक्षक परदेशी एस. जे.,सौ गमे एस.एस., यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सेवक वर्गाच्या सहकार्याने मिरवणूक यशस्वी पार पडली.










Leave a Reply