Chinchwad News : एमएस काटे चौकातील नाला ठरतोय नागरिकांना घातक  : राजेंद्र जगताप 

Chinchwad News : एमएस काटे चौकातील नाला ठरतोय नागरिकांना घातक  : राजेंद्र जगताप

कठड्याला संरक्षक जाळी बसविण्याची मागणी

Pckhabar- नवी सांगवीतील एमएस काटे चौकात नाल्याला कठडा नसल्याने पादचारी तोल जाऊन नाल्यात पडण्याची शक्यता आहे. विकासकामे करताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी  कोणतीही उपाययोजना महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे या नाल्यावर संरक्षक कठडा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
पिंपळे गुरवकडून सांगवी जाणाऱ्या रस्त्यावर सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर असलेल्या एमएस काटे चौकातील नर्मदा गाडर्नच्या शेजारी असलेल्या नाल्यावर संरक्षक कठडा बसविण्यात आलेला नाही. तसेच नाला उघडा असल्याने नागरिक लघुशंका करण्यासाठी नाल्याच्या बाजूला जातात. परिणामी संरक्षक कठडा किंवा जाळी नसल्याने नागरिक तोल जाऊन नाल्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी अनेकजण तोल जाऊन पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या ठिकाणी संरक्षक जाळी किंवा कठडा बांधण्यात यावा, अशी मागणीही राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

           पिंपळे गुरव नवी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. महापालिका वं स्मार्ट सिटी प्रशासनाने कामे करताना नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. या ठिकाणच्या नाल्याला संरक्षक जाळी किंवा कठडा बांधण्यात यावा. अन्यथा नागरिक नाल्यात पडून अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही.
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *