Pune News : अस्पृश्यांसाठीच्या पहिल्या शाळेचे ग्रंथालयात रूपांतर

Pune News : अस्पृश्यांसाठीच्या पहिल्या शाळेचे ग्रंथालयात रूपांतर

मंत्री रामदास आठवले व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

Pckhabar-महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८५२ मध्ये देशातील अस्पृश्यांची पहिली शाळा ज्या वास्तुत सुरू केले, त्या ऐतिहासिक अहिल्याश्रम वास्तूला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूचे रूपांतर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले ग्रंथालयात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन व डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी एमडी शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

          हा कार्यक्रम रविवारी (२५ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या आवारात होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे आणि डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डीटी राजपूत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *