Dehu News :  संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Dehu News :  संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Pckhabar-  रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू शाळेत कर्तव्य फौंडेशन देहू व M.I.T. पुणे MIMER कॉलेज आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनीच्या आरोग्य विषयक तपासण्या करण्यात आल्या.

हे शिबिर दि. 16 ते 21 सप्टेंबर या कालावधीत पार पडले. या  शिबिरात नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, दंत विषयक आणि हिमोग्लोबिन तपासण्या करण्यात आल्या.

शिबिरासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा वडाळकर, पर्यवेक्षक आनंदराव तांबे यांनी पाठपुरावा केला. विद्यालयातील सर्व वर्गशिक्षकांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

विद्यालयामार्फत उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून शिबीर संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *