Pimpri News : कन्या विद्यालयात 25 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Pckhabar- ब्रिजस्टोनुल्हाने, योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य व स्टेशनरी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेटे शारदा यांनी केले. प्रास्ताविका मध्ये यांनी योजक संस्था व ब्रिजस्टोन टायर कंपनी या दोन्हीही संस्थांचे ऋण व्यक्त केले. नीतिका गुल्हाने यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून अधिकाधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले व या मदतीतून पालकांचा आर्थिक भार कमी होईल असे सांगितले. योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांनी बोलताना विद्यार्थिनींनी शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक परिस्थिती हा अडसर न मानता जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करावा असे सांगितले.
मदत मिळालेली विद्यार्थ्यांनी पल्लवी कुद्रे हिने या दोन्हीही संस्थांचे आभार व्यक्त केले व आर्थिक सहकार्य व मदतीचा नक्कीच सदुपयोग करू असे मनोगतातून व्यक्त होताना सांगितले. या कार्यक्रमास ब्रिस्टोन कंपनीच्या सीनियर ऑफिसर नीतीका गुल्हाने, योजक संस्थेच्या संस्था संस्थापिका रेणू इनामदार, संस्थेच्या सदस्य, समीना सय्यद, सचिन कविटकर, नीलम नाणेकर, स्नेहल भुते, चैताली बोरोले व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ पाटील मॅडम, मुख्याध्यापिका शेटे शारदा मॅडम इत्यादी मान्यवर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार उपशिक्षिका भंडारे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे मीनल साकोरे यांनी केले.










Leave a Reply