आज एकाच दिवशी कोरोनामुळे 41 जणांचा मृत्यू, 865 नवीन रुग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोनामुळे तब्बल 41 जणांचा आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शहराच्या विविध भागातील 853 आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 865 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 37 हजार 716 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 37 हजार 716 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 399 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 719 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 141 अशा 860 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6137 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज शहरातील 34 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कृष्णानगर (पुरुष 55 वर्षे) थेरगांव (स्त्री 66 वर्षे) गांधीनगर (स्त्री 58 वर्षे) पिंपरी (स्त्री 31 वर्षे, पुरुष 57 वर्षे, स्त्री 64 वर्षे) चिंचवड (स्त्री 49 वर्षे,पुरुष 74 वर्षे) तळवडे (पुरुष 75 वर्षे) बिजलीनगर (पुरुष 68 वर्षे) काळेवाडी (पुरुष 82 वर्षे, पुरुष 45 वर्षे, स्त्री 70 वर्षे) निगडी(स्त्री 40 वर्षे, पुरुष 59 वर्षे) भोसरी (स्त्री 70 वर्षे) रुपीनगर (पुरुष 65 वर्षे, पुरुष 45 वर्षे) सांगवी (पुरुष 66 वर्षे) दिघी (पुरुष 77 वर्षे) पिंपळेगुरव (स्त्री 49 वर्षे) कासारवाडी (स्त्री 57 वर्षे) चिखली (पुरुष 60 वर्षे) रहाटणी (पुरुष 80 वर्षे,पुरुष 65 वर्षे) फुगेवाडी (पुरुष 80 वर्षे) चाकण (पुरुष 66 वर्षे, स्त्री 56 वर्षे, पुरुष 70 वर्षे) आंबेठाण (स्त्री 54 वर्षे) शिरुर (पुरुष 72 वर्षे) खेड (पुरुष 88 वर्षे) हिंजवडी (पुरुष 37 वर्षे) येथील रहिवासी आहेत.










Leave a Reply