Talegaon Dabhade News : शिक्षक दिनानिमित्त यशवंतनगरमधील शिक्षकांचा सन्मान

Talegaon Dabhade News : शिक्षक दिनानिमित्त यशवंतनगरमधील शिक्षकांचा सन्मान

महिला शिक्षकांच्या वतीने गणरायाची महाआरती

विरचक्र मित्र मंडळ आणि माजी नगरसेवक निखिल भगत यांचा उपक्रम

Pckhabar-  शिक्षक दिनाचे औचित्य साधून विरचक्र मित्र मंडळ आणि माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या वतीने यशवंतनगर, तपोधाम काॅलनीमधील सर्व महिला शिक्षकांच्या वतीने महाआरती करण्यात आली.

शिक्षक दिनानिमित्त  यशवंतनगर तपोधाम,  काॅलनीमधील शिक्षकांचा  सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनसेवा समिती संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, माजी नगरसेवक निखिल भगत, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्निताताई निखिल भगत, निरंजन जागीरदार, चंदन कारके व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगरसेवक निखिल भगत म्हणाले , ”शिक्षण हाच माझा स्वधर्म, विद्यार्थी हेच दैवत,  ज्ञानदान हीच पूजा व समाजाचा आशीर्वाद हाच प्रसाद असे मानणाऱ्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त देशात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.’ यानिमित्त यशवंतनगर, तपोधाम काॅलनी परिसरातील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *