Pimpri News : कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

Pckhabar- रयत शिक्षक संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे गुरूंविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींच्या वतीने आयोजन करण्यात आले.
शिक्षण हाच माझा स्वधर्म, विद्यार्थी हेच दैवत, ज्ञानदान हीच पूजा व समाजाचा आशीर्वाद हाच प्रसाद असे मानणाऱ्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय श्री हनुमंत नेवाळे साहेब, तसेच नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य मा . श्री गाढवे सर, विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे , सन्माननीय पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु पल्लवी कुद्रे या विद्यार्थिनीने करताना प्रत्येक काम हे श्रेष्ठ असते हा अनुभव मिळाला असे मत व्यक्त केले. यानंतर शिक्षक मनोगत व्यक्त करताना आज शिक्षकांची भूमिका साकार केलेल्या कु विद्यार्थीनी प्रतिनिधी कु नेहा राव व कु रेणुका भंडारी यांनी डॉ राधाकृष्णन यांचे शैक्षणिक , सामाजिक कार्य याविषयी माहिती दिली. यानंतर शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ रंजना धामणे , व सौ मीनल साकोरे यांनी शिक्षक दिन का साजरा करायचा हे सांगत डॉ राधाकृष्णन यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व स्कूल कमिटी सदस्य मा . श्री हनुमंत नेवाळे साहेब यांनी भारतीय संस्कृतीत गुरूंचे आदराचे स्थान उदाहरणांतुन व्यक्त केले . यानंतर पुढील अतिथी श्री गाढवे सर (मा . प्राचार्य – नवमहाराष्ट्र विद्यालय ) यांनी देखील डॉ राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती दिली.
यानंतर विद्यालयाच्या सन्मानीय पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांनी विद्यार्थिनींनी मधून देखील भावी आदर्श शिक्षक व भावी राष्ट्रपती घडू शकतात असा सकारात्मक विचार प्रकट केला.
यानंतर विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शारदा शेटे यांनी डॉ राधाकृष्णन हे जिज्ञासु व्यक्तिमत्त्व असून अखंड वाचन, चिंतन व ज्ञानदान या सर्व कृतींनी त्यांचे जीवन समृद्ध झालेले होते व त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व होते असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अभिज्ञा हरोले हिने केले व कु सिद्धी धुर्वे हिने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.
Pimpri News : कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न










Leave a Reply