Talegaon Dabhade News : शिक्षक दिनानिमित्त सलील कुलकर्णी साधणार विद्यार्थी -शिक्षकांशी संवाद

Talegaon Dabhade News : शिक्षक दिनानिमित्त सलील कुलकर्णी साधणार विद्यार्थी -शिक्षकांशी संवाद

Pckhabar- इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.
हा कार्यक्रम संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. ५) सकाळी ठीक १०.३० वाजता हा होणार आहे.
एक संवेदनशील लेखक, गायक, संगीतकार म्हणून नावाजलेले सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा शिक्षण व्यवस्थेवर वेगळे भाष्य करणारा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या माध्यमातून डॉ. कुलकर्णी विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि अन्य संस्था सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ. मलघे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *