Pune News : नारायणराव सणस विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

Pune News : नारायणराव सणस विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

विविध स्पर्धांचे आयोजन

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवी अखेर विद्यार्थ्यांनी लंगडी,खो-खो, तीन पायाची शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.

क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बांदल, सामाजिक कार्यकर्ते महादेव पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील क्रीडा शिक्षक राजेंद्र देशपांडे, संतोष राऊत यांनी केले. तर क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक महादेव पवार, पर्यवेक्षिका सुवर्णा परदेशी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *