Pimpri News : कन्या विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत उत्तम यश   

Pimpri News : कन्या विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत उत्तम यश

Pckhabar- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत एन एम एम एस परीक्षा सन 2021 -22 मध्ये घेण्यात आली होती.

या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या विद्यालयाची विद्यार्थीनी अंशु विजय दराडे  हिला सन 2021-22  मधील राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांचे या विद्यार्थिनीला प्रोत्साहन लाभले.  व विद्यालयातील एन एम एम एस  विभाग प्रमुख स्वाती धामणे, मार्गदर्शक शिक्षक  उनवणे बी एस, काकडे आर आर, धामणे एस व्ही, फुलसुंदर जी टी यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

या उत्तम यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, पर्यवेक्षिका उर्मिला पाटील, विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *