Pimpri News : प्रेरणा कौशल्य विकास संस्थेतर्फे आयोजित ‘कौशल्य विकास महाकार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड : प्रेरणा कौशल्य विकास संस्थेतर्फे आयोजित ‘कौशल्य विकास महाकार्यशाळेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ही कार्यशाळा शनिवार,दि( २०) ऑगस्ट २०२२ रोजी विद्या विकास प्रशाला,कासारवाडी येथे पार पडली. प्रेरणा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून एकदिवशीय “कौशल्य विकास महाकार्यशाळा ” यशस्वीरीत्या संपन्न झाली. या कार्यशाळेस लायन देविदास ढमे, ऋषिकेश मुसमाडे, जयश्रीताई मांडे, जयंत मांडे, दुर्गाशंकर बेहरा, अजित देशपांडे यांनी भेट देऊन प्रशिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
सकाळी लायन बळवंत मुके.अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम यांनी दीप प्रज्वलन करून महाकार्यशाळेचे उद्घाटन केले. सायंकाळी माजी प्रांतपाल लायन ओमप्रकाशजी पेठे यांनी समारोपप्रसंगी उपक्रमाचे कौतुक केले व वर्षभर हे उपक्रम राबवून गरजूंना मार्गदर्शन करावे असा मोलाचा सल्ला दिला.
लायन देविदास ढमे, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पूना निगडी यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना संपूर्ण सहकार्याची हमी दिली.
लायन राजेंद्र भोसले अध्यक्ष विद्यार्थी विकास मित्र मंडळ यांनी प्रेरणा कौशल्य विकास संस्थापक लायन उषा येवले व प्रशिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले.
सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही कार्यशाळा सायंकाळी साडेपाच वाजता संपली, त्यावेळी देखील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलत असलेला आनंद, उत्साह व त्यातून विद्यार्थ्यांना मिळालेली ऊर्जा हीच कार्यशाळा यशस्वी झाल्याची साक्ष देत होती,नव्हे तर हीच या कार्यशाळेची फलनिष्पत्ती आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.कारण अनंददायी शिक्षण ही काळाची गरज व ज्ञानोपासकांची निकड आहे. दैनंदिन शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन वेगळं काही शिकायला मिळाल्याने विद्यार्थ्यांचाआनंद द्विगुणित झालेला होता. अल्पावधीतच सर्वच विषयाच्या मान्यवर प्रशिक्षकांनी त्यांच्या अध्यापन कौशल्याने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेवून त्यांना आपलंसं केलं होतं, हे त्या-त्या प्रशिक्षकांचा सन्मान करतांना त्यांचं नाव घेताच विद्यार्थ्यांमधून होणारा टाळ्यांचा कडकडाटच उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनास आणून देत होता. हे प्रशिक्षक D.ed B.ed M.ed चे प्रशिक्षण घेतलेले नसताना देखील अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे, प्रत्येक विषयाची थेअरी व मूळ संकल्पना स्पष्ट करून,प्रत्यक्ष कृतीतून, व आवश्यक मशिन्स, आवजारं, हत्यारे वगैरे साधनांच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देत होते. हे मिळालेले ज्ञान शालेय अभ्यासक्रमाला पूरक ठरणार असून ते विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहील व त्याचा उपयोग ते त्यांच्या भावी जीवनात निश्चितच करतील यात तिळमात्र शंका नाही.










Leave a Reply