Pimpri News : आनंददायी शिक्षण ही काळाची गरज : लायन राजेंद्र भोसले
महाकार्यशाळेचे भोसले यांच्याकडून भरभरून कौतुक
पिंपरी-चिंचवड : सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली कार्यशाळा सायंकाळी साडेपाच वाजता संपली. त्यावेळी देखील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलत असलेला आनंद, उत्साह व त्यातून विद्यार्थ्यांना मिळालेली ऊर्जा हीच कार्यशाळा यशस्वी झाल्याची साक्ष देत होती, नव्हे तर हीच या कार्यशाळेची फलनिष्पत्ती आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण आनंददायी शिक्षण ही काळाची गरज व ज्ञानोपासकांची निकड आहे. दैनंदिन शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन वेगळं काही शिकायला मिळाल्याने विद्यार्थ्यांचाआनंद द्विगुणित झालेला होता, असे मत विद्यार्थी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष लायन राजेंद्र द. भोसले यांनी व्यक्त केले.
अशोक येवले, उषाताई येवले व प्रशिक्षक सुनिता मधुरे, हरण पाटील, नवनाथ भुतकर, सदाभाऊ कुंभार, संजय चौधरी व प्रियंका दरेकर या सर्वांचे अथक प्रयत्न व प्रेरणा तसेच लायन बळवंत मुके अध्यक्ष लायन्स क्लब स्पेक्ट्रम, लायन अनिल भागडिया अध्यक्ष लायन्स क्लब आकुर्डी, लायन देविदास ढमे , अध्यक्ष लायन्स क्लब निगडी या सर्वांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ” कौशल्य विकास महाकार्यशाळा ” एम जे एफ ला.ओमप्रकाश पेठे माजी प्रांतपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २० ऑगस्ट २०२२) रोजी आनंदात व यशस्वीपणे संपन्न झाली.
या कार्यशाळेनंतर लायन राजेंद्र भोसले यांनी कार्यशाळेबद्दल तोंड भरून कौतुक केले आहे.
लायन राजेंद्र भोसले म्हणतात, अल्पावधीतच सर्वच विषयाच्या मान्यवर प्रशिक्षकांनी त्यांच्या अध्यापन कौशल्याने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेवून त्यांना आपलंसं केलं होतं, हे त्या-त्या प्रशिक्षकांचा सन्मान करतांना त्यांचं नाव घेताच विद्यार्थ्यांमधून होणारा टाळ्यांचा कडकडाटच उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनास आणून देत होता.
हे प्रशिक्षक D.ed B.ed M.ed चे प्रशिक्षण घेतलेले नसताना देखील अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे,प्रत्येक विषयाची थेअरी व मूळ संकल्पना स्पष्ट करून,प्रत्यक्ष कृतीतून, व आवश्यक मशिन्स, आवजारं, हत्यारे वगैरे साधनांच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देत होते. हे मिळालेले ज्ञान शालेय अभ्यासक्रमाला पूरक ठरणार असून ते विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहील व त्याचा उपयोग ते त्यांच्या भावी जीवनात निश्चितच करतील यात तिळमात्र शंका नाही.
आपण केलेले अथक प्रयत्न व सहकार्यामुळे आम्हांला हे सहज शक्य झालं आपण करत असलेल्या अशा प्रकारच्या सेवा कार्यामुळे आम्हांला व आमच्या सर्व शिक्षकांना ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपले व आपल्या सर्व प्रशिक्षकांचे आणि लायन्स क्लब स्पेक्ट्रम, लायन्स क्लब निगडी, लायन्स क्लब आकुर्डी व सर्व लायन्स मान्यवरांसह सर्वांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो व त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण हिताकरिता आंम्ही आपल्या सेवा कार्यात सदैव आपल्या बरोबर निश्चितच आहोत. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. लोभ आहेच तो अधिक वृद्धिंगत व्हावा अशी अपेक्षा विद्यार्थी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष लायन राजेंद्र द. भोसले यांनी व्यक्त केली आहे.










Leave a Reply