Dehugaon News : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या आई हाॅस्पिटलचे शानदार उद्घाटन

Dehugaon News : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या आई हाॅस्पिटलचे शानदार उद्घाटन

Pckhabar- अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या देहूगाव येथील डॉ. विशाल लोंढे यांच्या आई हाॅस्पिटलचे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे वडील बाळू लोंढे आणि आई दैवशाला लोंढे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) रोजी सायंकाळी शानदार उद्घाटन करण्यात आले.

देहू-आळंदी रोडवरील मोरया कॉम्प्लेक्स, कंद पाटील नगर, जैन मंदिराजवळ हे हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी देहू नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस सुनील कडूसकर, आदर्श उपसरपंच स्वप्नील काळोखे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रविण काळोखे, रोहित काळोखे, मयुर शिवशरण, नगरसेविका पुजा दिवटे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, पुण्याचे माजी नगरसेवक राहूल तुपे, अतुल मोहिते, डॉ. अमर भोरे, डॉ. धनंजय चरजन, डॉ. जितेंद्र पाचांगे, डॉ. अक्षय अडाले, डॉ. सुजित मोहिते, डॉ. अनिश सिंघ, डॉ. अमोल गोठवाड, डॉ. सुमित खांडेकर, यासह आई हाॅस्पिटलचे संचालक डॉ. विशाल लोंढे, संचालिका डॉ. दिक्षा लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हाॅस्पिटलमधील सुविधांबाबत माहिती देताना डॉ. विशाल बा. लोंढे एम.एस. (स्त्रीरोग प्रसुतीतज्ञ)आणि डॉ. दिक्षा वि. लोंढे (बी. ए. एम. एस. पी. जी. डी. ई. एम. एस.) म्हणाले, तीर्थक्षेत्र देहूगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची आणि विशेष करून महिलांची गरज ओळखून आई हाॅस्पिटल

(प्रसुतिगृह व वंध्यत्व निवारण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध आहेत.

आई हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा

> सुसज्ज प्रसुतीगृह

> अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर

> प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात तपासणी

२४ तास अत्यावश्यक सेवा

> वंध्यत्व तपासणी सल्ला व उपचार

कर्करोग निदान व उपचार

> स्त्रीरोग चिकित्सा व उपचार

गर्भवती स्त्रीयांचे लसीकरण

* तपासणी वेळ *

सकाळी ९ ते दुपारी १, सायंकाळी ५ ते रात्री ९ (रविवारी अपॉइंटमेंट नुसार)

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *