Bhoom News : सावरगाव येथील शिंदे वस्तीवरील सिंगल फेज वीजेचा प्रश्न मार्गी लावू : खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आश्वासन
सावरगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांच्या शिष्टमंडळास खासदारांचे आश्वासन
Pckhabar – सावरगाव येथील शिंदे वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून लोकवस्ती वाढत आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांना वीजेची मोठी गरज आहे. त्यामुळे शिंदे वस्तीवर सिंगल फेज वीज वाहिन्यांचा प्रश्न मार्गी लावून वीज पुरवठा करावा, अशी मागणी सरपंच जनाबाई यादव यांचे चिरंजीव जयराम मच्छिंद्र यादव, उपसरपंच शिवहारी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्जून महानवर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश यादव यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आज (मंगळवार) पाथरूड येथील ग्रामपंचायतच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी जयराम यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी शिष्टमंडळाने शिंदे वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठ्याचे काम लवकर व्हावे. तसेच सावरगाव येथे प्रवाशांना थांबण्यास बस थांबा नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा आणि पाऊस अंगावर झेलत एसटीची वाट पहावी लागते. खासदार निधीतून बस थांबा उभारावा, अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाने केली.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावून, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.










Leave a Reply