Sad News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन

Sad News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन
Pckhabar- शिवसंग्रामचे नेते  विनायक मेटे (Vinayak Mete)  यांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात मेटे यांचे निधन झाले आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना आज (रविवार) बोगद्यामध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला.  मेटे यांच्या निधनामुळे एक लढवय्या नेता आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाची मोठी हानी झाली आहे.

दरम्यान,  अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होते.  मेटे यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *