कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळत नसल्याचा आरोप; मनसेचे पालिकेत आंदोलन

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळत नसल्याचा आरोप; मनसेचे पालिकेत आंदोलन

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेड मिळत नाहीत. कोरोनामुळे दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे. बेडची उपलब्धता वाढविण्याच्या मागणीसाठी मनसेने आज (बुधवारी) पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण आहे. या रुग्णांना  व्हेंटिलेटर, आयसीयूचे बेडची आवश्यक असते. पण, त्यांना बेड उपलब्ध होत नाही. कोरोनामुळे दिवसाला 20 ते 25 जणांचा मृत्यू होत आहे. शहरातील सद्याची स्थिती पाहाता सरकारी व खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल आहेत. यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आर्थिक खर्च परवडत नसल्यामुळे किंवा अशा लोकांना शहरामध्ये आयसीयु व व्हेंटीलेटरची सुविधा मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्ण दगावत आहेत.
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे चिखले यांनी सांगितले. शहरामध्ये आत्तापर्यंत 685 कोरोना रुग्ण मृत झालेले आहेत, असेही ते म्हणाले.

मनसेचे पालिकेतील गटनेते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू साळवे,
विशाल मानकरी, बाळा दानवले, मयुर चिंचवडे,
दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, रवी जाधव सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *