Pimpri News : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रभात फेरी
Pckhabar- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानांतर्गत गुरूवारी नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बँड-पथक, झांज-पथक यांच्या साथीने तिरंगा हातामध्ये घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी राष्ट्रध्वज कशाप्रकारे फडकवावा याची संहिता ग्रामस्थांना समजावून सांगितली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा घरोघरी फडकवावा, याविषयी जनजागृती केली.
या फेरीमध्ये विद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी पाटील, उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुभांगी गमे तसेच सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.










Leave a Reply