Pune News : इथे पशु व प्राण्यांची गणना होते, मग जातीनिहाय जनगणना करण्यात सरकारला काय अडचण ?

Pune News : इथे पशु व प्राण्यांची गणना होते, मग जातीनिहाय जनगणना करण्यात सरकारला काय अडचण ?

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा सवाल

भर पावसातही रासपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

Pckhabar-या देशात पशु व प्राण्यांची सुद्धा गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना करण्यात सरकारला काय अडचण आहे, आमच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात याच कार्यकर्त्यांना घेऊन संसदेत घुसेन, असा इशाराही महादेव जानकर यांनी मोदी सरकारला दिला. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

        गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्यात आले. भर पावसातही रासपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव, हरिभाऊ राठोड, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, समन्वयक सचिन गुरव, संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर, पुणे महिला अध्यक्ष सुनीताताई किरवे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कविताताई जावळे, वैशाली जाधव यांच्यासह सर्व विभाग अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच विविध राज्यांमधून कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही कार्यकर्ते धनगर समाजाच्या परंपरागत वेशभूषित होते. ही वेशभूषा अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

महादेव जानकर म्हणाले, की ज्या प्रमाणात लोकसंख्या आहे, त्याच प्रमाणात आरक्षण राहिले पाहिजे. यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. 1921 मध्ये जातीनिहाय जनगणना झाली होती. आता जातीनिहाय जनगणना करण्यात काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे जातीनिहाय जनगणना करावी केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे अशा मागण्या करण्यात आला आल्या

या मागणी बरोबरच शेतकऱ्यांना मोफत वीज, शेतमालाला हमीभाव, सर्वांना समान शिक्षण मोफत मिळावे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आदी मागण्याही करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *