Talegaon Dabhade News : महावितरणच्या पोलला अज्ञात वाहनाची धडक; तळेगाव स्टेशन परिसरातील बत्ती गूल

Talegaon Dabhade News :
महावितरणच्या पोलला अज्ञात वाहनाची धडक; तळेगाव स्टेशन परिसरातील बत्ती गूल
Pckhabar- तळेगाव स्टेशन चौकात आज (सोमवार) पहाटे अज्ञात वाहनाने महावितरणच्या पोलला धडक दिल्याने पोल वाकडा झाला. यामुळे वीजवाहिन्या तुटल्या असून तळेगाव स्टेशन भागातील स्टेशन चौक, यशवंत नगर, वतन नगर, मनोहर नगर, मोहननगर, तपोधाम कॉलनी, इंद्रायणी वसाहत, जोशीवाडा, वराळे, माळवाडी आदी भागाचा विद्युत पुरवठा पहाटेपासुन खंडीत झाला आहे.

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पहाटे पासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना सकाळी सकाळी मनस्ताप सहन करावा लागला. वीज पुरवठा नसल्याने सोसायट्यामधील पाण्याच्या टाक्या भरता आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्याची मोठी अडचण झाली.