Article By Dr. Ankush Jadhav : ‘सुगंधित व उपयोगी–जायफळ’
Pckhabar – मिरीस्टिका फ्राग्रन्स(लॅटिन नाव) या वनस्पतीच्या अर्थात जायफळाच्या झाडाच्या पक्व व सुकलेल्या बी वरील जाळीदार आवरणाला “जायपत्री ” तर आतील भागास “जायफळ “असे म्हणतात. याचे फळ पिकल्यानंतर फुटते व जायपत्री आपोआप बाहेर येते. फळ ही बाहेर येते.
संस्कृत मध्ये १)गंध युक्त फळ म्हणून जायफळ
२)सुगंधी कोष असतो म्हणून जातिकोश
३)हे जास्त प्रमाणात खाल्ले असता याने मद म्हणजे नशा, धुंदी येते म्हणून मदशौडक इ. अनेक पर्यायी नावे आहेत.
१००ग्राम जयफळात
स्निग्ध पदार्थ-३६ ग्रम,
पोटॅशिअम-३५० मि. ग्रॅम,
सोडिअम-१६ मि. ग्रॅम,
प्रथिने-६ ग्रॅम, साखर-२८ ग्रॅम,
जीवनसत्त्व “क”-५%,लोह-१६%,
मॅग्नेशियम-४५%,कॅल्शियम-१८%,जीवनसत्त्व-“ब ६”१८%,
कॅलोरी-५२५
याचे मूळ मोलकाझ या बेटावरील असून याची लागवड उष्ण कटिबंधात अधिक होते. याचे उत्पन्न मलाया, श्रीलंका, पेनांग, दक्षिण भारतात जास्त होते.
यात पायनींन, मिरीस्टिसिन कॅमफेन इ.स्वाद आणणारे घटक असतात.
जायफळातील स्थिर तेल हे जातीफल नवनीत(Butter of Nutmeg) या नावाने ओळखले जाते. जायपत्रीमध्ये पिवळट, सुगंधित तेल असते. त्यात “मेसीन” नावाचे तत्व असते. सामान्यतः जायफळ चवीला तिखट गोड, उग्र गंधाचे व मसालेदार असते.
यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्यापैकी काही
१)जुलाब- सुंठ व जायफळ एकत्र उगाळून त्यात गूळ व तूप घालून शिजवून (गरम करून) देतात.
जुलाब व वेदना कमी होतात.
२)डोकेदुखी-सर्दी, पडसे इ.
कारणामुळे असेल तर जायफळ तेलात उगाळून त्याचा लेप कपाळावर करतात.
३)हृदय वेदना-अपचन, पोटातील गॅसेस मुळे हृदयात कळा येत असतील तर जायफळ उगाळून चाटवले असता पोटातील गॅस निघून जाऊन हृदयातील वेदना कमी होतात.
४) शीघ्र पतन-जायफळ उगाळून खाल्ले असता वीर्यपतन लवकर होत नाही.
५)तोंडावरील डाग-तोंडावर काळसर ठीपके व निळसरपणा आला असेल तर जयफळाचा तोंडावर लेप करावा.
६)जीभ जड असणे(बोलण्यास त्रास होत असेल तर)- जायफळ चघळावे.
७)तारुण्य पिटीका-जायफळ दुधात उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर करावा.
८)पायांना पडणाऱ्या भेगा (पाय फुटणे)-जायफळ उगाळून लावावे.
९)झोप न येणे-जयफळा पूड तुपात मिसळून त्याचा कपाळावर लेप करावा.
१०) जायपत्री च्या तेलाने लहान मुलांची भूक व वजन वाढते.
११) जायपत्री व नारळाचे तेल एकत्र करून त्याने टाळूला मालिश केल्यास केस गळणे थांबून केसांची वाढ होते.
१२)संधीवताच्या दुखण्यावर जायपत्री च्या तेलाने मालिश केले असता वेदना कमी होतात.
१३) इसब असल्यास तेथे जायपत्री चे तेल लावावे.
१४) दम्याचा जोर असता १ ग्राम जायपत्री मधात मिसळून दिवसात ४/५ वेळा खाल्ले असता चांगला आराम मिळतो.
जयफळाचा उपयोग प्रामुख्याने गोड पदार्थ, मिठाई , केक इत्यादीमध्ये करतात. ‘ उपयोग प्रामुख्याने मसाल्यात करतात.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली).










Madhuri Ankush Jadhav
Informative article 👍