Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार

 

Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार

Pckhabar- गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नवमहाराष्ट्र विद्यालयात स्वर्गीय सहदेव गणपत पवार यांचे स्मरणार्थ दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलास व स्व. विमल सहदेव पवार यांचे स्मरणार्थ दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलीस दोन हजार रुपयांचे बक्षीस सौ. रोहिणी विक्रम देशमुख यांचे हस्ते देण्यात आले. शिवाजी विजय बधाले याने ९३.६०% गुणासह प्रथम क्रमांक मिळविला व या बक्षिसाचा मानकरी ठरला.

माजी शिक्षिका त्रिशलादेवी पंडित यांनी यावेळी इं.५ वी तील १० विद्यार्थ्यांना वह्या , पेन, पेन्सिल यांचे वाटप केले.

यावेळी शिक्षकांचा सत्कार पेन, श्रीफळ व विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वतः तयार केलेली भेटकार्ड देवून करण्यात आला.

यावेळी विराज सुतार, क्षितीज माने, पृथ्वीराज राठोड, शिवम राऊत, वेदांत जाधव, स्वरूप इंगळे, यश लोखंडे, आशुतोष जाधव, शुभम पवार, सर्वज्ञ सेवेकर, ओमकार पवार या ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकाना वंदन केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी पाटील, उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख , पर्यवेक्षक शरद परदेशी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन निता शेटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *