Alandi News : सुनेच्या आत्महत्येप्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह तिघांना अटक

 

Alandi News : सुनेच्या आत्महत्येप्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह तिघांना अटक

Pckhabar- आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह त्यांचे पती आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी प्रियांकाचे वडील अनिल घोलप यांनी आळंदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
प्रियांका ही पिंपरी- चिंचवडमधील भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती. नोव्हेंबर महिन्यात प्रियांकाचा विवाह अभिषेक उमरगेकर यांच्यासोबत झाला होता.

नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक (वय 60 वर्षे) यांनी सुनेचा छळ केला आणि त्यांना मुलगा अभिषेकने (वय 27 वर्षे) साथ दिली. लग्नानंतर लगेचच सासरच्यांनी मुलीचा संसारोपयोगी साहित्य तसेच फर्निचर कधी आणणार यावरुन शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच प्रियांका उमरगेकरने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय हुंड्यासाठी पैशांची मागणी केली जात होती, असेही गुन्ह्यात नमूद आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *