पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णवाढ दोन आठवड्यात स्थिर झालेली दिसेल – नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
Pckhabar- पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, आरोग्य आणि महसूल विभागाच्या समन्वयातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलली जातील. त्यानुसार निश्चितच पुढच्या दोन तीन आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णवाढ स्थिर (कर्व्ह) झालेली दिसेल, असे सांगत गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सर्वंजण मिळून कोरोनाला नक्की हरवूया आणि कोरोनाची युद्ध जिंकू याची मला खात्री आहे, असा विश्वास नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्वाधिक चाचण्या जिल्ह्यात केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक रुग्णवाढ दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे हे खरे आहे. पण, राज्यातील सर्वाधिक चाचण्या पुण्यात होत आहेत. साहजिकच जेवढ्या जास्त चाचण्या होतील. तेवढे जास्त पॉझिटीव्ह रुग्ण सापडणार आहेत. याबरोबरच रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जुलैमध्ये 50 टक्के होते. आज तेच प्रमाण 75 टक्यांवर आहे. म्हणजे रिकव्हरी रेट चांगला आहे. त्याचे श्रेय आरोग्य यंत्रणेला निश्चितपणे द्यावे लागले. गेल्या आठवड्यातील ‘सिरो’ सर्वेनुसार हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी लोकांमध्ये झाल्या आहेत.
पुण्यात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. 1 जुलैला दिवसाला 15 हजार चाचण्या केल्या जात होत्या. दोनदिवसांपूर्वी 53 हजार दिवसाला चाचण्या केल्या आहेत. आठवड्यातील चाचण्यांचा आढावा घेतला. तर, 1 जुलैला 38 हजाराच्या आसपास चाचण्या झाल्या. तर, पाठीमागच्या आठवड्यात जवळपास 75 हजारापर्यंत चाचण्या झाल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपण झाले आहे. चाचण्यावाढल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. मोठ्याप्रमाणात रुग्ण आयसोलेट केले आहेत. संभाव्य परिस्थिती विचारात घेता सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.










Leave a Reply