Pimpri News : कन्या विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत काल शनिवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सहशालेय उपक्रमा साठी इयत्ता 5 वी च्या विद्यार्थीनीनी वारकरी वेशभूषा धारण केली होती , 6 वी च्या विद्यार्थिनींनी वृक्षदिंडी, 7 वी च्या विद्यार्थिनींनी ग्रंथदिंडी , व 8 वी च्या विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती . यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे , पर्यवेक्षिका सौ ऊर्मिला पाटील व नवममहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या सौ मीनाक्षी पाटील यांचे हस्ते वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व वारकरी दिंडीचे पूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षण विषयक संदेश व वाचनाचे महत्त्व पटवून देणारे फलक व घोषवाक्य तयार केले होते. पिंपरी नगरीच्या परिसरातून ही दिंडी” झाडे लावा , झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे , ग्रंथ हेच गुरू , वाचाल तर वाचाल , विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ” या नामघोषात मिरवणुक पार पडली.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. व उपस्थित सर्वांचे व पालकांचे आभार विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ मीनल साकोरे यांनी व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply