Pimpri News : मुखी विठ्ठलाचे नाम घेवू, एक तरी झाड लावू ; नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी

 

Pimpri News : मुखी विठ्ठलाचे नाम घेवू, एक तरी झाड लावू ; नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी

ढोल ताशाच्या गजरात पिंपरी परिसरात पर्यावरण विषयक जनजागृती

Pckhabar- नवमहाराष्ट्र विद्यालयात वृक्षदिंडी पाऊस, वारी अन् भक्तीमय वातावरणात नवमहाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरीगावात उत्साहात वृक्षदिंडी काढली.

वृक्ष पालखीचे पूजन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी पाटील, उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख, पर्यवेक्षक शरद परदेशी, पर्यवेक्षिका शुंभागी गमे, कला शिक्षक राजेंद्र आडमुठे, क्रीडा शिक्षक कृष्णाजी नरुटे , उपशिक्षिका माया गायकवाड, मंगल परळे, सारिका नाळे, निर्मला ठोंगीरे, गीताजंली शिंदे, अभिमन्यू मोटे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. तसेच ऑक्सिजन हवा तर झाडे लावा , कावळा करतो काव काव म्हणतो माणसा झाड लाव इ. घोषणा ढोल ताशाच्या गजरात दिल्या. पिंपरी परिसरात पर्यावरण विषयक जनजागृती केली.

वृक्ष दिंडीमुळे विद्यार्थ्यामध्ये नवीन उत्साह संचारला आणि टाळ मृदुंगाच्या साथीने त्यांनी मुखी विठ्ठलाचे नाम घेवू, एक तरी झाड लावू इ. गीते सादर केली.
वृक्षदिंडीचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे यांनी केले. वृक्षदिंडी अतिशय उत्साहात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *