Talegaon Dabhade News: मूल्यसंस्कार, व्यक्तिमत्व विकास शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Talegaon Dabhade News: मूल्यसंस्कार, व्यक्तिमत्व विकास शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्या वतीने मूल्यसंस्कार, व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

Pckhabar-श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) बालसंस्कार व प्रबोधन विभाग आयोजित एकदिवसीय मूल्यसंस्कार, व्यक्तिमत्व विकास शिबिराला बालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील बालकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी बालकांना मार्गदर्शन केले, शिबिराचे महत्व सांगितले.

तळेगाव स्टेशन, इंद्रायणी कॉलनी येथील सप्तश्रृंगी माता मंदिरात रविवारी (दि.3) मूल्यसंस्कार, व्यक्तिमत्व विकास शिबिर पार पडले. सकाळी 8 वाजता भूपाळी आरतीने शिबिराला सुरुवात झाली. सामुदायिक मार्गदर्शन, शिशु संस्कार मार्गदर्शन, सर्वांगीण विकास डेमो, संस्कार कार्ड डेमो, चित्रकला, टाकावू पासून टिकाऊ वस्तू बनविणे, रांगोळी व शिवणकला, लाठी-काठी डेमो, ब्रेन-मॅपिंग डेमो घेण्यात आले. याशिवाय स्तोत्र मंत्र पाठांतर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, आदर्श दिनश्चर्येबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कब्बड्डी, खो-खो, मैदानी खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे मनोगत आणि पालकांना मार्गदर्श झाले. त्यानंतर शिबिराची सांगता झाली. शिबिराला आलेल्या बालकांची नाष्टा, जेवणाची आयोजकांनी सोय केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश काकडे म्हणाले, ”प्रगत भारताच्या निर्माणासाठी सद्यस्थितीत नवपिढीला नैतिक व मूल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. सध्याच्या युवा तसेच बालगोपालांना योग्य मार्गदर्शनाची गरज लक्षात घेता शिबिर घेतले. अध्यात्म, योग, खेळ, पर्यावरण, विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांना एकाच योजनेत बांधणा-या या एकदिवसीय शिबिराला बालक, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हे शिबिर बालक, पालकांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. शिबिरात सहभागी झालेल्या बालकांना अध्यात्मासह खेळ, पर्यावरणाची आवड निर्माण होईल. बालकांवर बालपणातच अध्यात्मासह विविध संस्कार होणे आवश्यक आहे. त्या हेतूने हे शिबिर घेतले होते”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *