Pimpri News : कन्या विद्यालयात 500 विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत इयत्ता 7वी ते 10 वी अखेरच्या सुमारे 500 विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांचे वतीने पूर्ण करण्यात आली.

तपासणीमध्ये ज्या विद्यार्थिनींचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे अशा विद्यार्थिनींना हिमोग्लोबिन वाढीसाठी औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व देखील समजावून सांगण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब आकुर्डीच्या प्रेसिडेंट कल्याणी कुलकर्णी तसेच सेक्रेटरी आनंदिता मुखर्जी, संदिप लाहोटी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कल्याणी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनीसाठी शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले व उपस्थित सर्वांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी स्वागत केले. व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन राशिनकर प्रविण यांनी केले .सदर तपासणी विद्यार्थीनी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी झाली.










Leave a Reply