Sangli News : शाळेतील बाला पेंटिंगसाठी आर्थिक मदत करणार : आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक डॉ. अंकुश जाधव यांचे आश्वासन

Sangli News : शाळेतील बाला पेंटिंगसाठी आर्थिक मदत करणार : आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक डॉ. अंकुश जाधव यांचे आश्वासन

Pckhabar- सुप्रसिद्ध लेखक,भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सेवानिवृत्त सहायक संचालक डॉ. अंकुश जाधव यांनी त्यांच्या आसद गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली.

शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत जगदाळे व अन्य शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.

जाधव यांनी स्वतः लिहिलेली महाऔषधी तुळस व सोनहिरा ही दोन पुस्तके शाळेला भेट दिली. त्याचबरोबर शाळेच्या व्हरांडा बाला पेंटिंगसाठी लागणारी सर्व रक्कम देण्याचा मानस व्यक्त केला.

याबाबत बोलताना डॉ. जाधव म्हणाले” आसद गाव ही माझी जन्मभूमी आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्याचा अनेक दिवसांनी योग आला आहे. शाळा परिसरातील वातावरण पाहून माझ्या बालपणीचे दिवस डोळ्यासमोर आले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *