Dehugaon News : होतकरू विद्यार्थ्यांना अभंग प्रतिष्ठानचा मदतीचा हात
विवेक ठाकूर यांच्या वतीने दोन विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मदत

Pckhabar- अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवासात सहकार्य करीत आहे. विद्यार्थी शिक्षण प्रेरणा उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
अभंग प्रतिष्ठानच्या कार्यात सदैव सहकार्य करणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्व विवेक ठाकूर यांच्या वतीने दोन विद्यार्थिनींना वह्या,पुस्तके,गाईड इ. शैक्षणिक साहित्य देण्यात आली.
यामधील एक विद्यार्थीनी अंकिता लोमटे ही १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. कोविडच्या काळात वडिलांच्या निधनानंतर अतिशय संघर्षातून आपल्या आईला मदत करीत शैक्षणिक प्रवास करीत आहे. आई अगदी सकाळी सात वाजता मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडते त्यानंतर अंकिता सर्व कुटुंबाची देखभाल करीत आईला मदत करीत आपला अभ्यास करून शिक्षण घेत आहे. तिला एक बहिण व एक भाऊ आहे.
तसेच प्रियंका लालू ढेकळे ही इयत्ता दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. आपल्या देहू पंचक्रोशीत सर्व शेतकरी बांधवांना ज्ञात असणारा लालू ढेकळे हा धनगर बांधव. आपले सर्व आयुष्य मेंढ्या राखण्यात गेलेला असताना आपल्या मुलींना मुलांना चांगलं शिक्षण द्यावं ही त्याची व त्याच्या पत्नीची शिक्षणाविषयीची आस कौतुकास्पद आहे. याच भावनेतून कष्टातून संसार करताना मुलांना ते शिक्षण देत आहेत. प्रियंकाच्या या शैक्षणिक प्रवासात तिला प्रेरणा मिळावी यासाठीच अभंग प्रतिष्ठानच्या वतीने तिलाही वह्या पुस्तके देऊन सदिच्छा देण्यात आल्या. अभंग प्रतिष्ठानच्या वतीने ही खूप काही मदत आपण करीत आहोत की आमची भावना नाही. पण कौटुंबिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही जीवनाचा संघर्ष करीत ही मुलं शिक्षण घेत आहेत एक समाज म्हणून आपण त्यांना साथ देणे व त्यांच्या या प्रवासात प्रेरणा देणे हे आपले कर्तव्य आहे व जबाबदारीही आहे. या कार्यात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तिमत्त्वांचे मनापासून धन्यवाद.
आपणही या उपक्रमाच्या माध्यमातून अशा प्रतिकूल स्थितीतून शिक्षण घेणाऱ्या होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करू शकता. किमान एका विद्यार्थ्याला आपल्याकडून असे सहकार्य होईल यासाठी प्रयत्न करूया..आपल्या अवतीभोवतीवती असे गरजू विद्यार्थी असतील तर संपर्क करण्याचे आवाहन अभंग प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.










Leave a Reply