Pimpri News: कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

Pimpri News: कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.

“योग: कर्मसु कौशलम्” या उक्तीनुसार विद्यार्थीनींचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग शास्त्रातील आसने व प्राणायाम आवश्यक आहे. यासाठी भारतीय योग संस्था पिंपरी शाखा यांच्या वतीने सौ संजीवनी देशमुख , सौ प्रमिला रासकर, सौ मंगला शेगांवकर, सौ शुभांगी वाघेरे व इतर सदस्य मार्गदर्शक म्हणून विद्यालयात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील व भारतीय योग संस्था पिंपरी शाखेच्या प्रमुख सौ संजीवनी देशमुख व इतर अतिथीगण यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले . यानंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांनी जीवनात योग्य व्यायाम, प्राणायाम , व पौष्टिक आहार यांचे महत्त्व मनोगतातून व्यक्त केले. यानंतर पिंपरी शाखेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांनी चे अनुलोम विलोम , कपालभाती, भस्त्रिका, या एकाग्रता साधणाऱ्या प्राणायाम प्रकाराबरोबरच पद्मासन, धनुरासन, भुजंगासन, मत्स्यासन ताडासन इत्यादी आसनांचे प्रात्यक्षिक सराव घेतला व विद्यार्थी जीवनात योग व निरामय आरोग्य याविषयी माहिती दिली. या

कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व अध्यापकवृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनघा रांगणेकर यांनी केले व उपशिक्षिका श्रीम . पौर्णिमा सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *