SHALAKON-2022 News : द असोसिएशन ऑफ शालाकी (TAS) इंडियाच्या निवडणुकीत महाराष्ट्र शाखेचे सर्वच सदस्य विजयी

SHALAKON-2022 News : द असोसिएशन ऑफ शालाकी (TAS) इंडियाच्या निवडणुकीत महाराष्ट्र शाखेचे सर्वच सदस्य विजयी

जयपूर येथे पार पडली निवडणूक

राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.सुवर्णा गोलेचा,
मुख्य सचिवपदी डॉ .संदीप निमसे सहसचिवपदी डॉ. राजेंद्र लाहोरे व डॉ मयुरेश कुलकर्णी यांची निवड

Pckhabar- द असोसिएशन ऑफ शालाकी ही इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन मधील नेत्रतज्ज्ञ व कान नाक घसा तज्ञ यांची राष्ट्रीय संघटना आहे.
दि.19 जुन 2022 रोजी जयपूर येथे झालेल्या ‘शालाकॉन 2022’ या वैद्यकीय परिषदेमध्ये TAS या राष्ट्रीय संघटनेच्या निवडणूकीत महाराष्ट्र शाखेचे 12 च्या 12 जागा जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

डॉ.सुवर्णा गोलेचा यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर डॉ.तुषार फिरके, डॉ चंद्रकांत गोसावी ,डॉ.आनंदराव खडके यांची निवड करण्यात आली.

डॉ .संदीप निमसे यांची मुख्य सचिव तर डॉ. राजेंद्र लाहोरे व डॉ मयुरेश कुलकर्णी यांची सहसचिव या पदावर नेमणूक करण्यात आली. खजिनदार हे पद डॉ प्रवीण चव्हाण यांनी स्वीकारले.

तसेच डॉ.सुरेश वाघ, डॉ मनोज भायगुडे, डॉ अनिल वायकुळे ,डॉ मयूर लांडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.

माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ हरिद्रा दवे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम बघितले. याप्रसंगी माजी सचिव डॉ.मंजिरी केसकर, माजी खजिनदार डॉ गंगा हद्दीमनी, संघटनेचे जेष्ठ सदस्य डॉ संगीता साळवी, डॉ. विवेक कानडे, डॉ चंद्रशेखर वलवनकर, डॉ शमशा फियाज, डॉ विरय्या हिरेमठ, डॉ प्रणव भागवत, डॉ समीर रासकर, डॉ. राधेश्याम झेंडे आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *