Chinchwad News : भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Chinchwad News : भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Pckhabar-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात योगसाधना या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा पोटेल्लीवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, योगा शिक्षिका स्वप्नाली पठारे, रायगोंडा माशाले, शिक्षिका ज्योती मोरे, शिक्षिका स्वाती गाडे, शिक्षिका मोनिका रामास्वामी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले. योगा शिक्षिका स्वप्नाली पठारे यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले.
आरती राव म्हणाल्या, की आजच्या धकाधकीच्या युगात योगासने करणे, ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. योगामुळे नकारात्मक भावना, भिती, राग, नैराश्य, चिंता दूर होण्यास मदत होते. प्रणव राव यांनी सांगितले, की योगासनाने एकाग्रता, स्मरणशक्ति, विचारांची स्पष्टता वाढते. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे, असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आशा घोरपडे, नीलम पवार व पूजा पोटेल्लीवार यांनी 21 जूनला योगा दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक रायगोंडा माशाले, शिक्षिका ज्योती मोरे, मोनिका रामास्वामी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व सांगितले. अदिती कागडा या विद्यार्थीनीने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस का साजरा करतात, हे सांगितले.
विद्यार्थीनी आर्या भोर पाटील या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *