Talegaon Dabhade News: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वनश्री नगरमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन
पतंजली योग समिती मावळ आणि उद्योजक गणेश मोहनराव काकडे यांच्या वतीने आयोजन
Pckhabar- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती मावळ आणि उद्योजक गणेश मोहनराव काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ( मंगळवार) वनश्री नगरमध्ये योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये योग, प्राणायाम, तसेच ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कला निकेतन, वनश्री नगरमध्ये हा कार्यक्रम उद्या सकाळी सात वाजता होणार आहे.
योग, प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन उद्योजक तथा तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केले आहे.










Leave a Reply