
Dehu News : सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ. प्रमोद लोहार करतायत वारकऱ्यांची सेवा
Pckhabar- समाजामध्ये आपण डॉक्टर व्यावसायिक रूपा मध्ये बघत आलो आहे. पण यामध्ये काही डॉक्टर्स आपल्या व्यवसायाला सामाजिक बांधिलकी जोपासत कार्यरत आहेत. असे डाॅक्टर अजरामर होतात.
असे एक डॉ. प्रमोद रामराव लोहार आहे. ज्यांनी जगात मुलगी वाचवा हा संदेश पोहचवला, अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले मागील 2 वर्षच्या करोना महामारीमध्ये अनेक रुग्ण यांना जीवन दान दिले. 18 करोना योद्धा सन्मान त्यांना मिळाले,22 मार्च 2022 त्यांना पुणे मध्ये राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
तीर्थ क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथे दर महिन्यात तिथे राहणारे सर्व सेवेकरी यांची मोफत तपासणी करतात.
देहू पंचक्रोशी मध्ये तसेच सर्व महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असणारे डॉ. प्रमोद रामराव लोहार यांनी 20/6/2022 रोजी जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने आषाढी वारी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वारकरी बंधू, बघिणी यांचे मोफत सर्व रोग निदान शिबीर, आणि मोफत सल्ला आपल्या श्री. मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिर समोरच ठेवले आहे. तरी सर्व वारकरी बांधवानी या शिबीर चा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. लोहार यांनी केले आहे.










Leave a Reply