Pimpri News: नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
Pckhabar- कोरोनाच्या प्रदीर्घ सावटानंतर तसेच उन्हाळी सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष 2022-2023 चे अतिशय उत्साहात स्वागत विद्यालयात करण्यात आले . विविध बॅनर, फुलमाळा , फुगे यांनी उत्कृष्ट सजावट विद्यालयात करण्यात आली होती.
इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांचे यावेळी पेन, गुलाबपुष्प, चॉकलेट ,वहया, पुस्तके देवून बॅंड च्या साथीने यावेळी स्वागत करण्यात आले.
यावेळी पिंपरी गावातील युवानेते ऋषीकेश वाघेरे, माजी प्राचार्य स्वामी सर, यादव सर , अशोक कुदळे, अमित बोत्रे, कार्तिक वाघेरे , विद्यालयाला मोलाचे सहकार्य करणारे बाळासाहेब वाघेरे तसेच अनेक विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक शरद परदेशी पर्यवेक्षिका शुंभागी गमे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे यांनी केले. प्रवेशोत्सव व नवागंताचे स्वागत यामुळे सर्व विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांच्या चेहर्यावरील आंनद पाहून शिक्षकांना खूप समाधान व विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.










Leave a Reply