Pimpri News : शाळेत किलबिलाट पुन्हा सुरू; कन्या विद्यालयात नवागतांचे सहर्ष स्वागत

Pimpri News : शाळेत किलबिलाट पुन्हा सुरू; कन्या विद्यालयात नवागतांचे सहर्ष स्वागत

Pckhabar- किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती , स्वप्नी आले काही एक मी गावं पहिला बाई
कवितेच्या या ओळीं सार्थ ठरविण्यासाठी , विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने शाळेत चैतन्य निर्माण व्हावे म्हणून नवागतांचे स्वागत करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात स्वागतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

विद्यार्थिनींचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी फुलांच्या माळा, रांगोळ्या, विविधरंगी फुगे , फ़ुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या व सनई चौघडा अशी जय्यत तयारी सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केली . या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते श्री हृषीकेश वाघेरे साहेब, श्री कार्तिक वाघेरे, तसेच श्री स्वामी सर (माजी मुख्याध्यापक) श्री यादव सर (माजी मुख्याध्यापक) श्री मोहन कुदळे , श्री सुभाष नाणेकर, श्री अमित बोत्रे,श्री अजिज शेख अतिथीगण लाभले

कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे व विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौ ऊर्मिला पाटील मॅडम , माननीय श्री हृषीकेश वाघेरे व इतर अतिथीगण यांचे शुभहस्ते सनई चौघड्याच्या निनादात विद्यार्थीनीचे औक्षण फुले देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर माननीय श्री हृषिकेश वाघेरे यांच्या व विद्यालयाच्या वतीने विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थीनींना वह्या व पुस्तकांचे अतिथीगणांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले . यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी माननीय श्री हृषीकेश वाघेरे यांनी विदयार्थीनींना भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. यानंतर इतर अतिथी गण श्री स्वामी सर, श्री यादव सर ,श्री कुदळे सर श्री कार्तिक वाघेरे यांनी देखील स्वयंशिस्त, पोषक आहार, विविध खेळ , शालेय उपक्रम यांतील सहभागातून स्वतःची व शाळेची उंची वाढवावी असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शाळेतून विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच विविध शालेय उपक्रम, प्रकल्प, स्पर्धा परीक्षा यांत सहभागी होऊन एक संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करावा व आपल्या यशातून शाळा देखील गौरवशाली बनवावी. असे मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांनी शाळा हे शिस्त , सद्गुण , संस्काराचे केंद्र बनावे असे मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास उपस्थित सर्व अतिथीगण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ अनघा रांगणेकर यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *