Dehugaon News : धार्मिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देता भाजपने महाराष्ट्राचा अवमान केला
खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर घणाघाती टीका
Pckhabar- श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देता भाजपने जाणूनबुजून महाराष्ट्राचा अवमान केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
खासदार सुळे यांच्या उपस्थितीत आज अमरावती येथे भाजप आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला.
जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू येथे संपन्न झाले. यावेळी राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजशिष्टाचारप्रमाणे पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच देहू येथील कार्यक्रमाला देखील हजर राहिले. मात्र केंद्र सरकारने मात्र राजशिष्टाचाराचे पालन न करता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांना भाषणाची संधी दिली नाही.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही बाब लक्षात आणून दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली जाते. मात्र सरकारचे प्रतिनिधी असलेल्या अजितदादांना बोलायला न दिल्यामुळे सर्व स्तरातून आता भाजप व केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.










Leave a Reply