Pckhabar- कोरोना अर्थात कोविड-१९ या महासाथीचे जागतिक संकट असून ते या जगातून लवकर हद्दपार होणार नाही. हे निश्चित झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोना बरोबरच जगायला शिका असे सांगितले आहे.
कोरोना हा मुळात प्राणी जगतातून माणसाकडे आलेला विषाणू आहे. याचे रुग्ण जगात प्रथम चीनच्या वूहान प्रांतात आढळून आले. कोरोना चा पहिला रुग्ण भारतात ३० जानेवारीला केरळ राज्यात आढळून आला. आता भारतात जवळ जवळ २७ लाख कोरोनाबाधित असून त्यापैकी १८ लाख बरे झालेले आहेत. एकूण मृत्यू ५१,७९७ झालेले आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत जगात चीन नंतर भारताचा नंबर लागतो. भारताची लोकसंख्या जवळ जवळ १३५ कोटीच्या दरम्यान आहे. भारतात प्रति चौ. कि. मी.मध्ये ४०५ लोक राहतात तर भारता पेक्षा क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या अमेरीकेत प्रति चौ. कि.मी.४० लोक राहतात. अमेरिकेची लोकसंख्या ३३ ते ३५कोटीच्या दरम्यान आहे . अमेरिकेत आता ५६ लाख ५५ हजार कोरोनाबाधित आहेत. दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या घनते चा विचार केला तर आज भारतात ५ कोटींपेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित असाला हवे होते. परंतु प्रत्यक्षात २७ लाखच आहेत. अमेरिका भारता पेक्षा पुढारलेला देश मानला जातो.
कोणताही रोग निश्चित करण्यासाठी जी तपासणी केली जाते, त्यास चाचणी(टेस्ट) असे म्हणतात. कोरोना हा आजार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा चाचणी केली जाते.
कोरोनाच्या आजाराची निश्चिती करण्यासाठी मार्च महिन्यात भारतात दिवसाला फक्त ३०० चाचण्या केल्या जात होत्या. भारताने ही चाचण्याची संख्या हळू हळू वाढविली व २२ एप्रिल रोजी ५ लाख तर ३ मे ला १० लाख चाचण्या केल्या. १ जुलै ,२० जुलै व २४ जुलैला १० लाख लोकसंख्ये मागे अनुक्रमे ६३९४,१०१८०व१११७९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता १७ ऑगस्ट रोजी ३ कोटी चाचण्या पूर्ण केल्या म्हणजेच ३ मे नंतर १७ ऑगस्ट या साधारणतः १०५ दिवसात २ कोटी ९० लाख चाचण्या पूर्ण केल्या. भारताने युद्ध पातळीवर प्रयत्न करून कोरोना चाचण्याचा वेग वाढविला. १८ऑगस्ट ला तर एकाच दिवसात ९ लाख चाचण्या पूर्ण करून एक रेकॉर्ड केले. आता एकाच दिवशी १० लाख चाचण्या केल्या जाणार आहेत. चाचण्या वाढल्या की रुग्णा ची संख्या वाढत जाणार हे निश्चित. अमेरिकेत आतापर्यंत ७ कोटी २३ लाख कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. जगात या आजारचा मृत्युदर ३.७५ आहे. तर भारतात तो १.९२ आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८एप्रिल ला २९.३६ टक्के होते ते आता ७२ टक्के आहे.
सर्वाधिक लोकसंख्या व सामाजिक जीवनमान तुलनेने खालावलेले असलेल्या भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने व मोठया प्रमाणात होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु सुदैवाने असे घडले नाही. भारतात जगातील अन्य देशांच्या तुलनेने कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्यू निश्चित कमी आहे.
कोरोनाने जगात किती ही हातपाय पसरले तरी ते भारतात रोखले गेले जातील. मुळात पाश्चिमात्य व विकसित देशांसारखी स्थिती भारतात येणार नाही. कारण त्यांच्या आणि भारताच्या परिस्थितीतच मूलभूत फरक आहे.
१)भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्याच चांगली आहे.
२)भारतीयांच्या आहारात वैविध्य आहे.हे वैविध्यच कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करणारे आहे.
३) भारतात बहुसंख्य लोक संमिश्र आहार घेणार आहेत.
४) भारतातील नैसर्गिक वातावरणच असे आहे की, जे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करु शकते.










Leave a Reply