Dehugaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत; हे रस्ते वाहतूकीसाठी बंद
Pckhabar- श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( मंगळवार) देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर दुपारी बारा वाजता पंतप्रधानांची संवाद सभा होईल. यामुळे देहू परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, वाहतुकीसाठी बदल करण्यात आला आहे.
असा आहे वाहतुकीत बदल
मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमान ते देहूगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. निगडीतील भक्तीशक्ती चौक त्रिवेणीनगर-तळवडे कॅनवे चौक पर्यायी मार्ग तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक-महिंद्रा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद राहील.
तळवडे गावठाण चिखली डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी पर्यायी मार्ग तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहू मार्ग देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक बंद, साईराज चौक सांगुडी फाटा परंडवाल चौक व भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद










Leave a Reply