Nigdi News: देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्यामूळे रूपीनगरच्या नागरिकांना धुराचा त्रास

Nigdi News: देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्यामूळे रूपीनगरच्या नागरिकांना धुराचा त्रास

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना
निवेदन आणि लगेच आयुक्तांना आदेश

Pckhabar- पिंपरी चिंचवड-रुपीनगर तळवडे हा परिसर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीलगत येतो.
देहूरोड मधील कचरा पश्चिम दिशेच्या मोकळ्या माळावर जमा केला जातो.
मनपा पालिका हद्दी बाहेर असलेल्या या कचऱ्याचे नियमाप्रमाणे विल्हेवाट न लावता गेली काही वर्षे हा कचरा देहूरोड हद्दीत जाळला जातो.
रुपीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की,या कचऱ्याचा धूर आणि धोकादायक प्रदूषण रूपीनगर,सेक्टर 22 सह रहिवाशी परिसरात पसरते यावर लवकर तोडगा काढा,अशी मागणी आम्ही गेली पाच वर्षे देहूरोड प्रशासन आणि आयुक्त पिंपरी चिंचवड मनपाकडे करत आहोत. परंतु हद्दीच्या वादामुळे आणि दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात ताळमेळ नसल्याने येथील नागरिक प्रदूषण मुक्त होऊ शकले नाहीत.
आज 3 जून रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अमोल भालेकर यांनी या दुर्गंधीयुक्त धुरापासून आणि कचऱ्यापासून नागरिकांना मुक्ती द्यावी अशी मागणी करणारे निवेदन दिले.

यावेळी अजित पवार यांनी आयुक्त राजेश पाटील यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,आयुक्त राजेश पाटील यांना प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत बैठक घेण्याचे आदेश दिले.या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर यावर तोडगा काढून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *