Nigdi News : रुपीनगरमध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीचा उत्साह
अमोल तुकाराम भालेकर, शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे जयंती कार्यक्रमाचे आयोजन
Pckhabar-अमोल तुकाराम भालेकर, शिवयोद्धा प्रतिष्ठान, रुपीनगर यांच्यातर्फे राजमाता अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. खऱ्या अर्थाने समाज घडवणाऱ्या आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देणाऱ्या महिलांच्या हस्ते पूजन करून नवीन आदर्श स्थापित करण्यात आला. तसेच अहिल्यादेवींच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांच्या उत्तुंग पराक्रमाची आणि कार्याची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या चरित्रपर पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अहिल्यादेवींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
अमोल भालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले: “अहिल्यादेवी म्हणजे देशाच्या इतिहासातील सोन्याचं पान. त्यांचा राज्यकारभार, न्यायनिवाडा, देव देश आणि धर्मावरील प्रेम. रयतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना यांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घ्यावा. एक स्त्री किती मोठे कार्य करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यामाता. त्यांच्या कार्याची महती सांगावी तितकी कमीच. या चरित्रपर पुस्तकाचं वाचन सर्व महिलांनी करून आपल्या मुलांमध्ये अहिल्यादेवींचे गुण वाढवावेत. हेच खरे त्यांना अभिवादन.
कार्यक्रमाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठाण अध्यक्ष-गजानन वाघमोडे,दत्ता करे,सुनिल बनसोडे,शिवाजी बिटके,राजेंद्र सोनटक्के,नाना गावडे,संजय रुपनवर,सचिन नायकवडे,दत्तात्रय सोलनकर,सिद्धराम सुर्यवंशी,सतिश कंठाळे,तुकाराम भालेकर,इब्राहिम बुराण,रामभाऊ भालेकर,दौलत कुटे,शंकर गवळी,उत्तम कांबळे,अतुल माने क्रांतिज्योत मित्र मंडळ शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सौरभ देवकाते,सागर गावडे यांनी केले. सुत्रसंचालन दर्पण येवले यांनी केले. अमोल भालेकर यांनी आभार मानले.










Leave a Reply