आंद्रा धरण शंभर टक्के भरले; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते जलपूजन
Pckhabar- मावळ तालुक्यातील धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात 100% भरलेले तालुक्यातील पहिले धरण आहे.आंदर मावळ, तळेगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होणाऱ्या आंद्रा धरणाचा जलपुजन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, चेअरमन अंकुश आंबेकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, मा.सरपंच शिवाजी पवार, पोलीस पाटील बबन पवार, उपसरपंच सुरेखाताई नखाते, सुदाम कदम, मंगेशकाका ढोरे, राघोजी तळपे, मोहन घोलप, गोविंदा आंभोरे, दत्तात्रय वायकर, विशाल पडवळ, चंद्रकांत घोलप, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, अनिल जाधव, विक्रम कलावडे, गोविंद तांबोळी, गुरुदेव घोलप, सुवर्णा घोलप, तसेच स्थानिक ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply