Chinchwad News: महाराष्ट्र अंनिसची कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न

Chinchwad News: महाराष्ट्र अंनिसची कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न

Pckhabar- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची पंचसूत्री, खगोलशास्त्र आणि विज्ञान, चमत्कार सादरीकरण, जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर महाराष्ट्र अंनिसच्या आकुर्डी पुणे शाखेने १५ मे रोजी कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेला 45 कार्यकर्ते उपस्थित होते. नेटकं संयोजन,दर्जेदार मांडणी यामुळे कार्यशाळा उत्साह आणि प्रेरणादायी झाली.

चिंचवड येथील अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, (हँडीकॅप सेंटर पुणे) येथे ही कार्यशाळा झाली. महाराष्ट्र अंनिसचे प्रधानसचिव संजय बनसोडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे,महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे,महाराष्ट्र अंनिसच्या विधी व्यवस्थापन विभागाच्या कार्यवाह अँड.मनीषा महाजन,महाराष्ट्र अंनिस आकुर्डी शाखेच्या कार्याध्यक्ष क्रांती दांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी सुनील चोरडिया, महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय बारी, महाराष्ट्र अंनिस आकुर्डी पुणे शाखा सचिव स्वप्नील वाळुंज,महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा निधी व्यवस्थापन विभागाचे कार्यवाह एकनाथ पाठक आदी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गंगाधर सत्वधर,विकास सूर्यवंशी, संजय बनसोडे,बाळासाहेब घस्ते, विशाल विमल,रविराज थोरात, श्रावणी वाळुंज,राजकुमार माळी, नितीन खलाने,डॉ. योगेश गाडेकर,सुनील चोरडिया व हँडीकॅप सेंटर पुणे यांची टीम यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *