Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कामकाज आजपासून क्रीडा संकुलातून

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कामकाज आजपासून क्रीडा संकुलातून

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज आज मंगळवारपासून मारुती मंदिर चौकातील नगर परिषदेच्या पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल या ठिकाणावरून सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

नगर परिषदेची सध्याची जुनी प्रशासकीय इमारत ही जीर्ण झालेली आहे. त्याठिकाणी अद्ययावत नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यात येणार असून, मंगळवारपासून नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल येथून सुरू राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

तळेगाव नगर परिषदेसाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *