Pimple Gurav News: पिंपळे गुरव येथील लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Pimple Gurav News: पिंपळे गुरव येथील लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Pckhabar- पिंपळे गुरव येथील श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक व संस्थापक राजेंद्र जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुनील कदम यांची तर सचिवपदी प्रा. सुरेश धाडीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय नेवसे यांनी काम पाहिले.

पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. आर्थिक वर्ष 2022 ते 2027 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तज्ज्ञ सल्लागार म्हणून विजूअण्णा जगताप, इंदिरा रजपूत, डॉ. भारती परदेशी-भट्टाचार्य यांची, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. बाजीराव दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक म्हणून संदीप राठोड, डॉ. महादेव रोकडे, सुनील इंगळे, शेखर निकम, अर्जुन शिंदे, पंकज मालविया, कस्तुरी कोलते, पल्लवी पाटील यांची निवड करण्यात आली.

बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालकांचा नूतन अध्यक्ष राजेंद्र जगताप व निवडणूक अधिकारी संजय नेवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना नेवसे यांनी सांगितले, की संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व संचालकांनी कार्यरत राहण्याची गरज आहे. कर्जदारास कर्ज देताना नियम व अटींची पूर्तता करूनच कर्जमंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. कर्ज वाटप, कर्ज वसुली याबरोबरच ठेवी वाढविण्याकडे सर्व संचालकांनी भर द्यावा. अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सर्व संचालकांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपाध्यक्ष सुनील कदम, सचिव प्रा. सुरेश धाडीवाल, संदीप राठोड, कस्तुरी कोलते, डॉ. महादेव रोकडे, पंकज मालविया यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत म्हाळस्कर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *