SYNERGY 2022 Pune News : अत्याधुनिक लेन्समुळे नागरिकांना ‘नवी दृष्टी’- डॉ. सचिन गाडे

Pune News : अत्याधुनिक लेन्समुळे नागरिकांना ‘नवी दृष्टी’- डॉ. सचिन गाडे

Pckhabar- डोळ्याच्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध होत असून
नागरिकांना उत्तम दर्जाच्या लेन्स डिझाईन्समुळे एक प्रकारची नवी दृष्टी मिळत आहे. डोळ्याच्या उपचारांमध्ये
अत्याधुनिक साधने आणि नवनवीन तंत्रांमुळे प्रचंड प्रगती झाली आहे. आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ अपारदर्शक लेन्स काढून टाकणे आणि बदलणे यापलीकडे गेले आहे, असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. सचिन गाडे यांनी केले.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत शनिवार (दि. 30) एप्रिल आणि रविवार (दि.1) मे अशा दोन दिवस वैद्यकीय परिषदेचे पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ‘डोळ्यांचे उपचार आणि लेन्स’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.गाडे बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. समीर रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गाडे पुढे बोलताना म्हणाले” डोळ्याच्या उपचारांमध्ये अत्याधुनिक साधने आणि नवनवीन तंत्रांमुळे प्रचंड प्रगती झाली आहे. आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ अपारदर्शक लेन्स काढून टाकणे आणि बदलणे यापलीकडे गेले आहे. ही एक अपवर्तक प्रक्रिया आहे. जी दरवर्षी जगभरातील 25 दशलक्ष लोकांना दृष्टी पुनर्संचयित करते. कमी गुंतागुंत असलेल्या चांगल्या परिणामांमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेची मागणी वाढली आहे.”

सक्रिय जीवन जगणाऱ्या रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्रक्रियेनंतर चष्म्यावर अवलंबून राहणे नको असते.त्यामुळे उच्च श्रेणीच्या अत्याधुनिक लेन्सेसला रुग्ण पसंती दर्शवत आहेत. लेन्स बसवताना रुग्णाच्या गरजेनुसार लेन्सची निवड करणे नेत्रतज्ञांसाठी क्रमप्राप्त झालेले आहे, असेही डॉ. गाडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *