Chinchwad News: वाचन हा ज्ञान मिळविण्याचा एक उत्तम मार्ग ः डॉ. दीपक शहा

Chinchwad News: वाचन हा ज्ञान मिळविण्याचा एक उत्तम मार्ग ः डॉ. दीपक शहा

Pckhabar- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पी.एच.डी. प्राप्त केल्याप्रित्यर्थ सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे,डॉ.पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्‍हाडे,मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरीया आदी उपस्थित होते.

डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, शिक्षण घेत असलेल्या सर्व शाखातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सुधारण्यासाठी व त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी समजावून घेत त्याचे योग्य निराकरणही वेळच्या वेळी प्राध्यापकांकडून झाले पाहिजे. कोरोना प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षा द्याव्या लागल्या अनेक विद्यार्थी ग्रंथालयापासून दुरावले होते. अनेक उत्तोमत्तोम लेखकांचे पुस्तके उपलब्ध असून त्याचे वाचन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी वाचन हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग असून वाचनामुळे विद्यार्थ्यांचा वाचनाचा शब्द संग्रह वाढण्यास मदत होते.

हा शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असला तरी विविध क्षेत्रातील लेखकांच्या पुस्तकांचे वाचन प्रत्येक विद्यार्थ्यांने करणे काळाची गरज आहे. पुस्तकाशी मैत्री करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शब्दसंग्रह वाढतो, आपले संवाद, कौशल्य सुधारते वाचनातूनच ज्ञान आणि समज मिळते. डोळ्यांना, मेंदूला ताण देणार्‍या मोबाईलमधील वाचनापेक्षा पुस्तक वाचनाची सवय केव्हाही चांगली. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने पुस्तक वाचन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. ही कौतुकास्पद बाब आहे.

आजच्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून प्रतिभा महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील आळीपाळीने पुस्तके वाचन करून जागतिक पुस्तक दिन साजरा केला. त्याचे नियोजन विभाग प्रमुख डॉ. अनामिका घोष, प्रा. अनिता विश्वकर्मा यांनी केले. महाविद्यालतील मुख्य व सहाय्यक ग्रंथपाल मीना डोंगरे, संयुक्ता बोरसे, सचिन गायकवाड, दिपक सोनावणे, सीमा इंगळे, मदतनीस रविंद्र नलावडे, विमल आलटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *