Pimpri News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली; अंकुश शिंदे नवे पोलीस आयुक्त

Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. कृष्ण प्रकाश यांची मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत राज्य गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आदेश जारी केला आहे.
कृष्ण प्रकाश हे सहा दिवसांपासून रजेवर गेले आहेत. तसेच कृष्ण प्रकाश हे काही प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार त्यांची बदली झाली आहे.










Leave a Reply