Pimpri news: पिंपरीत बुधवारी रोजगार मेळावा

Pimpri news: पिंपरीत बुधवारी रोजगार मेळावा

Pckhabar- बेरोजगार युवक युवतींसाठी मोरवाडी येथील  महापालिका औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये येत्या बुधवारी दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० पासुन रोजगार भरती मेळावा आयोजित केला असून संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

  महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार  प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महानगरपालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतींसाठी दि. ११ ते १५ एप्रिल दरम्यान कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये झालेल्या या शिबिरामध्ये विविध तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्ये परदेशातील नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक मार्गदर्शन, महिला कौशल्य विकास उद्योजकता आदी विषयांचा समावेश होता.  यामध्ये अनेक इच्छुकांनी यात सहभाग नोंदवत शिबीर यशस्वी केले. आता बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक यांच्या सहकार्याने हा रोजगार भरती मेळावा होणार आहे. या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून संबधितांनी  https://forms.gle/sePffuPoG42qEtcg9  या लिंकवर माहिती भरून नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *